मराठी मध्ये आपण ज्याला अपुर्णांक म्हणतो त्याला इंग्रजी तसेच प्रोग्रॅमिंग लॅंग्वेज मध्ये Real Constants म्हणतात. एखाद्या न संपणाऱ्या लाईन वर कोणताही पॉइंट ज्या नंबर ने दर्शवता येतो त्याला आपण real numbers म्हणतो. अर्थातच या नंबर्स मध्ये फ्रॅक्शन असतो जो डेसीमल पॉइंट वापरून लिहीता येतो. उदा: C language मध्ये
3.3276, 98.451748, -0.3746, -56.45 हे सर्व real constants म्हणता येतील.
Programming world मध्ये real numbers ना floating point constants असे सुद्धा म्हणतात. अर्थात रियल नंबर कोणत्या फॉर्मॅट मध्ये represent केला आहे त्या प्रमाणे real number किंवा floating point number म्हणणे कधीही चांगले.
रियल नंबर दोन प्रकारे represent करता येतो.
- Decimal Format
- Exponential Format
वर दिलेली उदाहरणे Decimal Format ची आहेत कारण त्या प्रत्येक नंबर मध्ये Decimal Point आहेच.
पण समजा काही नंबर मॅथेमॅटीक्स मध्ये जसे की:
232000000 किंवा 0.253287 असा असेल तर आपण तो
आपण अनुक्रमे
2.32 x 108
आणि
253287 x 10-6
असा लिहू शकतो. या प्रकारा ला खर तर exponential format म्हणतात. यालाच floating point format असे सुद्धा म्हणतात.
C language मध्ये Real Constant चे काही नियम आहेत ते प्रथम पाहू. कोणते आहेत ते...? तर
- रियल नंबर मध्ये डेसीमल पॉइंट असतो.
- जर डेसीमल पॉइंट नसेल तर exponential format असतो.
- रियल नंबर मध्ये कॉमा (,) अथवा ब्लॅंक स्पेस allowed नाही.
- तो +ve अथवा -ve असू शकतो. मात्र Default sign positive असते
मॅथेमॅटीक्स च्या वर दाखवल्या उदाहरणाप्रमाणे प्रमाणे एखादा रियल नंबर खुप मोठ्ठा अथवा छोटा असेल तर C मध्ये e हे अक्षर वापरून नंबर exponential format मध्ये लिहीता येतो. जसे की वरील नंबर C मध्ये
12345e-4 असा लिहीला जातो.
या ठिकाणी सुद्धा 12345 या फिक्स डिजीट्स ना mantissa म्हणतात व -4 ला exponent म्हणतात. खालील रुल्स exponential format मध्ये पाळले जातात.
- mantissa part व exponential part मध्ये e लिहीला जातो
- exponent पार्ट +ve अथवा -ve असू शकतो.
- floating point numbers store करण्यासाठी IEEE standard (Institute of Electrical and Electronics Engineers) वापरले जाते.
- 4 Bytes float constant ची range साधारणपणे 3.4e-38 to 3.4e+38 अशी असते. e च्या ऐवजी E असा लिहीला तरी चालतो.
- IEEE च्या standard नुसार 4 byte (32 Bits) फ़्लोट मध्ये
- 1 bit sign bit साठी
- 8 bits exponent साठी आणी
- 23 bits mantissa साठी
Real constant साठी C मध्ये float, double हे किवर्ड राखीव ठेवले आहेत जे अनुक्रमे 4 व 8 Bytes memory घेतात.
float साठी %f हा format specifier तर double साठी %lf हा format specifier वापरतात.
Watch video on how to construct Real Constant in C
No comments:
Post a Comment